शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असलेले शबनम न्यूज या वृत्तसंस्थेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन शुभेच्छा सप्ताह आयोजित करण्यात आला. या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी शबनम न्यूज वृत्तसंस्था वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचा सन्मान करण्यात आला. महापौरांचा सन्मान शबनम वृत्त संस्थेच्या संस्थापक संपादिका शबनम सय्यद व निवेदिका गजाला सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला. शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन महापौरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे या शहरासाठी करत असलेल्या कार्याचा गौरव व सन्मान करावा तितका कमी आहे. महिला महापौर असून आपल्या कार्यक्षम वृत्तीने पूर्ण संपूर्ण शहराची जबाबदारी सांभाळत आहे. आमच्या शबनम न्युज वृत्त संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा आम्हाला अभिमान आहे. अशी यावेळी शबनम सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील इतर कर्मचारी, पत्रकार व नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार संपादक रेहान सय्यद यांनी व्यक्त केले.