शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम परिसरातील संत निरंकारी सत्संग भवन येथे संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलभाऊ कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरास यशस्वी केले.
Advertisement
सध्या कोरोणा चे संकट काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर आयोजित करणे काळाची गरज आहे. तसेच रक्तदान हे श्रेष्ठ दान असते या आयोजित शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना याचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया या वेळी आमदार सुनील कांबळे यांनी दिली.आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.
Advertisement
Advertisement