उद्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ फेब्रुवारी) :- डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन केंद्रामध्ये ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीच्या वतीने डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि 18 आणि 19 फेब्रूवारी 2022 रोजी स 11 वा ‘एंडोस्कोपी आणि वंध्यत्व’ या विषयावर दोन दिवसीय “पीओजीएस स्टार एंडोजीन 2022 परिषद” आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेसाठी जगभरातून विविध तज्ञ डॉक्टर्स प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन माध्यमातून सहभागी होणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यपीठ सभागृहात आयोजित उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, प्र- कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगरू डॉ. एन. जे. पवार, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, सुप्रसिद्ध वंधत्वरोग तज्ञ डॉ.सुनीता तांदूळवाडकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेला सुरुवात होईल.
या परिषदेत सलग दोन दिवसात तब्बल 70 राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात एंडोस्कोपिक सर्जनद्वारे 70 शस्त्रक्रिया या थेट प्रक्षेपनाद्वारे दाखविण्यात येत असून यामध्ये स्त्रीरोगविषयक आजारांवरील लॅपरोस्कोपिक आणि हिस्टेरोस्कोपिक शस्त्रक्रिया या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या जागतिक दर्जाच्या सहा शस्त्रक्रियागृहात होतील.
दि 20 फेब्रुवारी रोजी शैक्षणिक विषयानुसार तज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शन, परिसंवाद आदी होत असून यामध्ये वैद्यकीय प्रदर्शनामध्ये 25 हून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील कंपन्या ही सहभागी होतील. पुण्यातील ही 8 वी एंडोस्कोपिक परिषद आहे.