शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
” सिमेवर देशसेवा करत असलेल्या जवानांना देशभरातील विविध ठिकाणच्या शालेय विद्यार्थ्याकडून दरवर्षी शुभेच्छा पत्रे तसेच रक्षा बंधना निमित्त राख्या पाठविण्यात येतात. या मुळे जवानांना प्रोत्साहन व बळ मिळत राहते. ‘ असे मत कमांडिंग ऑफिसरचे मेजर जनरल इंद्रजित सिंग यांनी रहाटणी पुणे येथे व्यक्त केले .
शुभेच्छा पत्रा बद्दल ‘ स्केच पेंट एक्स्प्रेस ऑफ इंडिया ‘ यांच्याव्दारे रहाटणी येथील एस . एन . बी . पी . इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुवारी ( दि . २६) कृतज्ञता सोहळा झाला . या वेळी श्री . लहू काळे (कलाशिक्षक ) केन्द्रीय विद्यालय आर्मी एरिया पुणे . यांचा मेजर जनरल इंद्रजित सिंह यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला .
यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या ४२ शाळांमधील प्राचार्य आणि काही कलाशिक्षक उपस्थित होते . पुण्यातून सुमारे १ लाख १५ हजार शुभेच्छा व कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे जवानांना पाठविली होती . या वेळी एसएनबीपी ग्रुप संस्थेचे संस्थापक डॉ. डी. के . भोसले , श्री . विजय श्रीवास्तव इत्यादी उपस्थित होते . अशी माहिती गौतम दिवार यांनी दिली.