शबनम न्युज | पुणे
मावळ | प्रतिनिधी
वडगाव मावळ येथील राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे आफताब सय्यद यांच्या या नवीन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
अल्पसंख्यांक विकास कौशल्य विकास या विभागामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत अल्पसंख्य समाजासाठी असणाऱ्या शासकीय योजना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यात राबवाव्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम ज्याप्रमाणे राबविला त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घ्यावा असे नवाब मलिक यांनी सांगितले तसेच मावळ तालुक्यातील मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न, दफनभूमी प्रश्न मार्गी लावणार असल्याचे हि सांगितले .
तसेच मावळ मध्ये राबविण्यात येत असलेले शासन आपल्या दारी उपक्रमाचे नवाब मलिक यांनी कौतुक केले.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, सुभाषराव जाधव, मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, सभापती, कृषी पशुसंवर्धन समिती समिती समिती बाबुराव वायकर नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष पूजाताई वहिले, नगरसेवक गणेश खांडगे, वैशाली दाभाडे, आयुब शिकिलकर, जाकिर खलिफा, चंद्रजीत वाघमारे, पुनम जाधव, प्रवीण ढोरे पुनम जाधव, तुकाराम ढोरे, राजेश बाफना, सोमनाथ धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.