शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठीचे साहित्य खरेदी करून घरी निघालेल्या महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घसरून तिचा मृत्यू झाला. नगर रस्त्यावर ही घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेला किरकोळ दुखापत झाली.
Advertisement
अनिता मंगेश विधाते (वय 31 रा. वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अनिता आणि त्यांची आई संगीता पांडुरंग जाधव (वय 52) नगर रस्त्यावरील चंदन नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी ही घटना घडली.
Advertisement