शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
सांगवी | प्रतिनिधी
जुनी सांगवी परिसरातील सुरु असलेले रस्त्यांची विकास कामे व प्रस्तावित विकासकामांचा पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी दौरा केला.सांगवीतील प्रस्तावित मधूबन सोसायटी १२ मीटर डी.पी.रस्ता,मुळा रोड १८ मीटर रस्ता,खेळाचे मैदान, सांस्कृतीक केंद्र,सांगवी बोपोडी पुल,पी.डब्ल्यु.डी.मैदानाशेजारील रस्त्यालगत झालेले अतिक्रमण व विकासकामाबाबत अधिका-यांसह पाहणी दौरा करत आढावा भेट दिली.
Advertisement
यावेळी ह प्रभाग सभापती हर्षल ढोरे,शारदा सोनवणे सहआयुक्त विजयकुमार थोरात, उपसंचालक नगररचना विभाग प्रभाकर नाळे,सहशहर अभियंता अशोक भालकर,सहशहर अभियंता श्रिकांत सवणे,सतिश इंगळे, कार्यकारी अभियंता अनिल राउत,प्रमोद ओंबासे,सुनिल वाघुंडे,जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement