शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र राज्यात तसेच आपल्या देशभरात महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत या वाढलेल्या अत्याचारांच्या विरोधात तसेच या अत्याचाराच्या घटनेत दोषी असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीकरिता तसेच राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्याकरिता पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले,
महिलांवर होणारे अत्याचार बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत या अत्याचाराच्या घटना थांबविण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे अशी टीका करत पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला तसेच अशा घटनांमध्ये दोषी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशीही मागणी करण्यात आली
या आंदोलनामध्ये महिला सेना- अश्विनी बांगर(शहराध्यक्ष), सीमा बेलापुरकर,(शहर सचिव)अनिता पांचाळ,उपशहराध्यक्षा स्नेहल बांगर,संगिता देशमुख ,विद्या कुलकर्णी, , वैशाली बोत्रे, वैशाली कोराटे अनिता नाईक,श्रद्धा देशमुख, संगीता कोळी, काजल गायकवाड , हेमंत डांगे -विद्यार्थी सेना अध्यक्ष के के कांबळे,आकाश लांडगे,रोहित थरकुड़े,किरण वाघेरे,सुशांत साळवी – वाहतूक सेना अध्यक्ष,रूपेश पटेकर – कर्मचारी सेना अध्यक्ष,विशाल सालूंखे,विशाल मानकरी,राजू भालेराव – जनहितकक्ष,राजेश,अवसरे,परमेश्वर चिल्लरगे,नारायण पठारे,अलेक्सझांडर आप्पा मोझेस,नाथा शिंदे
सुरेश सकट,नीलेश नेटके,तुकाराम शिंदे,ऋषिकेश जाधव,गणेश वाघमारे,अक्षय नाळे,डी एम कोळी
तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.