शबनम न्युज | पुणे
पुणे । प्रतिनिधी
आज ४ ऑक्टोबर तब्बल दीड वर्षानंतर महाराष्ट्रभरातल्या शाळांच्या घंटा वाजल्या. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि पुणे कँटोमेन्ट विधानसभा अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिवाडी-भवानी पेठ मधील विविध भागांमधल्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले.
यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर विद्यार्थ्यांना मास्क/ सॅनिटायजर खाऊ वाटप करण्यात आला. तसेच कोरोना संसर्गाविषयी जाणीव- जागृतीच्या फलकांचे देखील प्रदर्शन झाले.यावेळी पुणेशहर चिटणीस जुबेर बाबु शेख यांनी विद्यार्थी मित्रांना कोरोना जनजागृती विषयी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी ऑरचिड स्कुलच्या मुख्याध्यापिका शिक्षकवृंद तसेच सामाजिक कार्यकर्त्या दिलशाद जुबेर शेख , सारिका जाधव , श्रद्धा भिसे , रवीआण्णा जाधव आणि जुबेर बाबु शेख मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते व महिला, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.