शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गोठेधारकांनी गोठ्यांचे जनावरांच्या प्रमाणात अनुज्ञाप्ती शुल्क वनूतनीकरण शुल्क कार्यालयीन वेळेत बँकेचे चलन प्राप्त करुन बँकेत भरावे, असे आवाहन अनुज्ञाप्ती अधिकारी तथा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी सतिश डोईफोडे यांनी केले आहे.
Advertisement
याबाबत ३१ मार्च २०२२ अखेर गोठेधारकांनी शुल्क न भरल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी क्षेत्रात गुरे पाळणे व त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम१९७६ मधील कलम ६ अन्वये गोठेधारकांनादेण्यात आलेला परवाना (लायसन्स) निलंबीत अथवा रद्द करण्यात येणार आहे.
Advertisement