शबनम न्यूज | पुणे
उद्योगनगरीतील व वाकड भागातील सामाजिक , सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील युवा उद्योजक संतोष गुलाबराव कलाटे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्य पदी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संतोष गुलाबराव कलाटे यांना देण्यात आले आहे. यावेळी पक्ष कार्य वाढविण्याकरिता व त्यांच्या समाजकारण व पक्षाकरिता केलेल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
Advertisement
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप व पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समितीचे मा.अध्यक्ष विलास मडीगेरी उपस्थित होते.
Advertisement