शबनम न्युज | नाशिक
दिलीप सोनकांबळे | प्रतिनिधी
दिवसेंदिवस गुन्ह्यात भरपडत असून नाशिकात पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी महिलेच्या फोन मधील कॉल रेकॉर्डिंग तपासले असता संपूर्ण प्रकार समोर आला आहे. शरदचंद्र पवार मार्केट मागील तुळजा भवानीनगर भागातील विवाहितेने राहत्या घरात आत्महत्या केली. मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित २०१५ ते २६ जून २०२१ दरम्यान महिलेच्या संपर्कात होता.
एका क्रमांकावरून तो महिलेशी संपर्क साधून शरीरसुखाची मागणी करीत होता.
या काळात त्याने पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलच्या माध्यमातून तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. त्यातून तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक निरीक्षक डंबाळे तपास करीत आहेत. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.