शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
बाल दिनानिमित्त लोहगडावर आनंद मेळावा भरवण्यात आला. त्यामध्ये विविध प्रकारचे मैदानी खेळ, व्यायामप्रकार, इतिहासाची माहिती याबरोबरच टिम बिल्डिंग अॅक्टिव्हीटी यासारखे विविधांगी उपक्रम घेण्यात आले. मेळाव्यात 40 मुलांमुलींनी सहभाग घेतला.
इंडिया ट्रेक्स या संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून टीम लीडर श्वेता मिरजकर, प्रछी तत्कारे व मयुर नेमाडे यांनी काम पाहिले. कोरोनाचे नियम पाळून सर्व उपक्रम घेण्यता आले. संस्थेचे सर्वेश धुमाळ यांनी संयोजन केले.
दरम्यान, कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे सर्वाचे जीवन बंदिस्त झाले होते. मुलांचे बागडणे हरवले होते. अभ्यास व शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. या परिस्थितीमध्ये हा मेळावा मुलांना खूपच आनंद घेऊन गेला.
Advertisement