मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक संपन्न
शबनम न्युज : मुंबई
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी शरद पवार यांनी ग्रंथ संग्रहालयासमोरील समस्या जाणून घेतल्या.
Advertisement
यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाकडे वाचकांचा ओघ कसा वाढवता येईल यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. वाचकांसाठी नवीन सोयीसुविधांची उपलब्धता, नव्या उपक्रमांचे आयोजन तसेच ग्रंथालयात अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी आणि तरुण वर्ग ग्रंथालयाशी जोडला जाईल, अशा सूचना यावेळी शरद पवार यांनी केल्या.