शबनम न्युज : पिंपरी चिंचवड (दि.२३ नोव्हेंबर) :- पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा वाढदिवस येत्या 27 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक, नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे विविध कार्यक्रम आयोजित करून आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस साजरा करीत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग सदस्य दिनेश यादव यांच्या वतीने प्रभागातील महिलांसाठी खेळ पैठणीचा, न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम हा 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता बालघरे वस्ती, कुदळवाडी येथे होणार असून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.तसेच विजेत्यास मानाच्या सहा पैठणी देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस दुचाकी असेल तसेच दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस फ्रिज तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिसे टीव्ही देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकाचे बक्षीस वॉशिंग मशीन असून पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पिठाची गिरणी, सहावे बक्षीस कुलर म्हणून देण्यात आला आहे. तसेच यावेळी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला असून विजेत्यास पाच लिटरचा कुकर भेट म्हणून देण्यात येणार आहे. या न्यू होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका फॉर्म भरणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभाग सदस्य दिनेश यादव व सौ निशा दिनेश यादव यांनी केले आहे.