शबनम न्यूज : पुणे (दि.२५ नोव्हेंबर ) :- वाढत्या पुण्याच्या नगर नियोजनात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रिडेव्हलपमेंट ( पुनर्विकास ) विषयावर सर्वंकष विचार मंथन करण्याकरिता ‘गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ यांच्यातर्फे २६ ते २८ नोव्हेंबर रोजी ‘गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. गृह बांधणी विषयक प्रदर्शन, परिसंवाद, घर संकल्पनेला धरून काव्य आणि संगीत कार्यक्रम असे या फेस्टिवलचे स्वरूप आहे .
मनोहर मंगल कार्यालय येथे तीन दिवस हा फेस्टिवल होईल, या फेस्टिव्हलमधील गृह बांधणी, पुनर्विकास विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ नंदकुमार घाटे, उद्योजक श्याम मेहेंदळे, यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
फेस्टिव्हलचे संयोजक राजेंद्र आवटे, गणेश जाधव, मकरंद केळकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
गृहबांधणी विषयक प्रदर्शन तीनही दिवस सकाळी 10 पासून सायंकाळी ९ पर्यंत सुरू असणार आहे.