भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात मागील एक महिन्यापासून विविध सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजनात्मक उपक्रम राबविले जात आहेत .आमदार महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदार संघाचे दमदार आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रथम आमदारकीची निवडणूक 2014 मध्ये अपक्ष म्हणून लढविली. या आमदारकीच्या विजयानंतर ते काही काळ राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीपर्यंत भाजप समर्थक आमदार म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आणण्यामध्ये आमदार महेश लांडगे यांचा सिंहाचा वाटा आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची एक हाती सत्ता प्रस्थापित केली .2019 मध्ये आमदार महेश लांडगे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली व बहुमताने निवडून आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आमदार महेश लांडगे यांचे समर्थक, नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी आपल्या नगरसेवकांना दिलेला शब्द नेहमीच पाळला आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांना शब्द दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी त्यांना महापौर केले. तसेच राहुल जाधव यांनाही महापौरपदाचा शब्द दिला होता, त्यांना ही महापौर पदावर बसविले. तसेच स्थयी समिती सभापती पदावर संतोष लोंढे व नितीन लांडगे यांनाही दिलेल्या शब्दाप्रमाणे संधी दिली. यानंतर आमदार महेश लांडगे यांची ख्याती शब्द पाळणारा आमदार अशीच होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विकास कामासंदर्भात अनेक कामे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. शहराचा विकास, आपल्या मतदार संघाचा विकास, हाच ध्यास आमदार महेश लांडगे यांना असतो. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघ हा पिंपरी-चिंचवड शहरात नावाजला गेला आहे. त्यामागे आमदार महेश लांडगे यांची कार्यक्षमता त्यांची कर्तव्यदक्षता दिसते. आमदार महेश लांडगे यांना त्यांच्या या कार्यक्षमतेचे गुण पाहून भारतीय जनता पार्टी चे शहराचे शहराध्यक्ष पद मिळाले, आता येणारी महानगरपालिकेची निवडणूक आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात लढविली जाणार आहे. आमदार महेश लांडगे यांचे एका विकासात्मक विजन अंतर्गत अनेक विकास कामे त्यांच्या मतदार संघात होत आहे. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोट बांधण्यात आमदार महेश लांडगे यांना यश आले आहे. याची प्रचिती आपल्याला आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत नक्कीच दिसणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या वतीने कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना केलेली मदत, कोरोना काळात गरजवंतांना केलेली मदत, कोरोना रुग्णांना जीवनदायी ठरलेले प्लाज्मादान, अनेक गोरगरीब कुटुंबाना मदतीचा हात असे एक ना अनेक समाजकार्य होत आहे. त्यांचे सर्वच समाज कार्य हे या लेखात समाविष्ट करणे शक्य नाही. आपल्या नेतृत्व गुणाने व कार्यक्षमतेने आमदार महेश लांडगे हे दमदार आमदार म्हणून ओळखले जातात.
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय अभ्यास असणारा आमदारही महेश लांडगे यांना म्हटले जाते. नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमामध्ये हे सांगितले की, प्रभाग रचना कशीही असू द्या, पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचीच सत्ता पुढील काळात राहणार आहे. आपण जास्तीत जास्त भाजपचे नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता कायम राखण्यासाठी आपल्याला यशच येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अशा या दमदार आमदारांना आमच्या शबनम न्यूज परिवारावतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!