शबनम न्यूज | पुणे (दि.०३ डिसेंबर) :- ओम मेडिकल फाऊंडेशन आणि इंटरनॅशनल लायन्स कल्ब यांच्यावतीने तयार करण्यात आलेले 100 कार्डियक किट पुणे श्रमिक पत्रकार संघास भेट देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विक्की कांबळे आणि कार्यकारणी सदस्य चद्रकांत फुंडे व ओम हॉस्पिटलचे संचालक अशोक अग्रवाल व सुनिल अग्रवाल उपस्थित होते. ओम मेडिकल फाऊंडेशन आणि इंटरनॅशनल लायन्स कल्बच्या सहयोगाने आतापर्यंत सुमारे 5000 कार्डियक किटचे वितरण करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत ओम मेडिकल फाऊंडेशन आणि इंटरनॅशनल लायन्स कल्ब यांच्या संयुक्त विद्यमानाने हार्टअॅटक प्रंसगी उपयुक्त ठरणारे कार्डियाक किट तयार करण्यात आले आहे.या कार्डियाक किटचा हार्टअॅटक प्रसंगी वापर केल्यास रुग्णाला दवाखान्यात घेवून जाण्याच्या कालावधीत त्याची हृदयविकाराची तीव्रता कमी करण्यास मदत करतो आणि यामुळे रुग्णाला काही वेळ मिळतो जेणे करून डॉक्टरांना उपचार करण्यास वेळ मिळतो. यामुळे काही रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होवू शकते.