शबनम न्यूज | आकुर्डी (दि.०७ डिसेंबर) :- अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई,या रजिस्टर संस्थेतर्फे सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे,३५ या विद्यालयाच्या शिक्षिका,कवयित्री, लेखिका सौ.प्रतिमा काळे यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मधुसूदन घाणेकर सर,अष्टपैलू संस्कृती कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजी खैरे सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला,तसेच मी प्रतिमा माझी प्रतिमा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेच्या अक्षरमंच काव्यलेखन समूहात प्रत्येक महिन्याला होणाऱ्या काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धेत वर्षभर सहभाग घेतला.या काळात त्यांनी सादर केलेल्या स्वरचित व उत्तम साहित्याची दखल घेत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या स्पर्धेत राज्यातील११३कवींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी श्री.प्रताप पाटील ( मुंबई), ह.भ.प. सुपेकर महाराज,ह.भ.प. पाटील महाराज,ह.भ.प.अलका झरेकर,कोषाध्यक्षा सौ.अनुसया खैरे मॅडम उपस्थित होते.सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे,३५ शाळेचे संस्थापक मा.गोविंद दाभाडे सर,मुख्याध्यापिका सौ.दातीर मॅडम,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.राजू माळे सर,उपप्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षक श्री.काळोखे सर,पर्यवेक्षिका सौ.आहेर मॅडम यासह शिक्षकवृंदानी कौतुक केले,व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.