गज़ाला सय्यद
शबनम न्यूज | मुंबई (दि.०७ डिसेंबर) :- मुंबई येथे शिवसेना राज्य संपर्क कार्यालय ‘शिवालय’ मध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे ‘ जनता दरबार’ घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
Advertisement
शिवसेना राज्य संपर्क कार्यालय ‘शिवालय’ मुंबई येथे बुधवार, दिनांक ८ डिसेम्बर २०२१ रोजी सकाळी 9.30 ते 11.30या वेळेत ‘जनता दरबार’ घेणार येणार असून हा उपक्रम कोविड – १९ च्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. असे हि यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.
तरी नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘शिवालय’ येथे बुधवार (दि.८) रोजी कोविड – १९ च्या सर्व नियमांचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे.
Advertisement