शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०७ डिसेंबर) :- कोविड मध्ये जीवावर उदार होत रिक्षा चालविल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली. रिक्षा चालक हे देखील कोविड योद्धे आहेत. त्यांचा सन्मान करणे गजरेचे आहे. या उद्देशाने महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने रिक्षा चालकांना कोविड योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संग्राम जगताप, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे व रिक्षा ब्रिगेड वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी रिक्षा चालक मालक, पदाधिकारी उपस्थित होते.
रिक्षा चालकांचे नेते बाबा कांबळे यांची विशेष मुलाखत या वेळी घेण्यात आली. ‘रिक्षा चालक ते रिक्षाचालकांचे यशस्वी संघटन’ या विषयावर अक्षय मोरे यांनी मुलाखत घेतली. या वेळी बाबा कांबळे यांनी आपला जीवनपट उपस्थितांसमोर उलघडला.
या वेळी संत रोहिदास महाराज चर्मोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, उद्योजक बशिर मामा शेख , महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष शफीक भाई पटेल उपस्थित होते.
बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, संजय दौंडकर, हिरामण गवारे, निखिल येवले , अनिल शिरसाठ ,जाफर भाई शेख, सुनील जाधव ,खलील भाई मकानदार ,प्रदीप अहिरे, सोमनाथ शिंदे ,रवींद्र लंके ,दीपक कुसळकर ,तुषार लोंढे ,सुरज सोनवणे ,मनीष दौंडकर ,रमेश ढवळे ,कैलास वलांडे ,सिद्धेश्वर सोनवणे ,मिनीनाथ कानडे, बाळासाहेब बागडे, सिद्धार्थ साबळे ,किरण एरंड ,आयाज शेख ,अन्सार शेख आदी रिक्षा चालक सहकुटुंब उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये घरकाम महिला सभा अध्यक्ष सौ आशाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे संयोजन सर्व महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड पदाधिकारी पिंपरी चिंचवड शहर यांनी केले होते.