शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- किवळे,विकास नगर, मामुर्डी , रावेत परिसरातील युवा नेते दिपक भाऊ भोंडवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माई बालभवन अंध संस्थे करिता मदत देण्यात आली व अंध मुला ,मुलींसमवेत केक कापण्यात आला. दिपक भाऊ भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त विजय पानसरे प्रस्तुत सलाम इंडिया हा संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या परिसरातील असंख्य नागरिकांनी या सांगतीक कार्यक्रमाचा आनंद लुटला या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख आकर्षण म्हणून अभिनेत्री ईशा केसकर प्रमुख्याने उपस्थित होती.
अभिनेत्री ईशा केसकर ने आपल्या गोड शब्दात दिपक भोंडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच दिपक भाऊ भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त या परिसरातील खवय्यांसाठी खाऊ गल्ली चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खाद्यपदार्थांचे आस्वाद नागरिकांनी घेतले, तसेच लहान मुलांसाठी या वाढदिवसानिमित्त बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या बाल जत्रेत लहान बालकांनी मुलांनी मुलींनी वेगवेगळ्या खेळांच्या द्वारे आनंद लुटला दिपक भाऊ भोंडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे व भाजपचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आदर्श नगर मध्ये झालेल्या या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात संदीप काळोखे,अमोल कालेकर,अशोक करमारे,प्रशांत कुंभार,निखील जाधव, वैभव देशमुख,अशोक काळे परिसरातील नागरिक माता भगिनी , तसेच बाळ गोपाळ व दिपक भाऊ भोंडवे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.