शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ डिसेंबर) :-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिशन फॉर विजन फाउंडेशन, पुणे व लक्षवेध स्पोर्ट्स फाऊंडेशन मोशी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा निरीक्षक सौ कविता संदेश आल्हाट यांच्या सहकार्याने मोशी परिसरात शनिवार दिनांक 18 डिसेंबर व रविवार दिनांक 19 डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिराचे उद्घाटन आज सकाळी संपन्न झाले, भोसरी चे प्रथम आमदार विलास लांडे व सोसायटीतील जेष्ठ नागरिकांचे उपस्थित उदघाटन करण्यात आले, तसेच दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.
या शिबिरात हिमोग्लोबिन, रक्तदाब ,मधुमेह ,जनरल तपासणी, कान तपासणी , मोफत डोळे तपासणी, डोळ्यांचे सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी, निदान व शस्त्रक्रिया मोतीबिंदु बाबत मार्गदर्शन व अल्पदरात आधुनिक शस्त्रक्रिया, चष्म्याचा नंबर काढून सवलतीच्या दरात उच्च दर्जाचे चष्मे या शिबिरात द्वारे देण्यात येणार आहे या शिबिरात आरोग्याची जनरल तपासणी श्री स्वामी समर्थ हेल्थ सेंटर तसेच डोळ्यांची तपासणी डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या सहकार्याने होत आहे.
या शिबिरास प्रामुख्याने युवा उद्योजक प्रकशशेठ गव्हाणे , ॲड.रामचंद्र बोराटे ,युवा नेते संतोष शेठ बोराटे ,जेष्ठ प्रगतशील शेतकरी धर्माजी अल्हाट ,भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष संगीता आहेर ,पिपंरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सपना घाडगे , सरिता ताई झिंब्रे , शर्वरी ताई ,युवा नेते ॲड विशाल जाधव ,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दादा आहेर , युवा नेते वासुदेव जाधव , मा.सरपंच गणपत दादा आहेर , उद्योजक अनिल तापकीर ,सामाजिक कार्यकर्ते अनिल तापकीर , सोसायटी मधील जेष्ठ श्री सुनील कवडे , श्री कंद काका , श्री सूर्यवंशी अदी उपस्थित होते.सदर आरोग्य शिबिर हे दोन दिवस सुरु राहणार असून या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ कविता संदेश आल्हाट यांनी केले आहे.
तसेच शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर वूड्स विले फेज 1 मध्ये आयोजन करण्यात आले . या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे नगरसेवक अजित भाऊ गव्हाणे तसेच सोसायटी चेरमन माऊली भाऊ लांडे पाटील ,शमुख काका , अर्जुन शिंदे ,प्रशांतजी कटके , विमला अंटी , जयश्री गाडे ताई. , जयश्री नेमाडे , हेमलता ताई , रोहिणी ताई , अभा पाठक , तसेच सोसायटीतील सर्वच पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.