माहिती अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विनंती
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२१ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड महापालिका मधील ठेकेदार प्रकाश लाड यांच्या कंपनी क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेकेदार पद्धतीने काम देताना महापालिका कडून जो ठराव पास केला गेला, त्याचप्रमाणे क्रिस्टल इंटिग्रेटेर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेकेदाराकडून सिक्युरिटी गार्ड व स्वच्छता कामगार यांना त्यांच्या ठरलेल्या वेतन प्रमाणे वेतन दिले जात नाही, तर प्रत्येक कामगारांचा पगार हा एक सारखा नसून वशिलेबाजी पद्धतीने वेगवेगळा पगार दिला जात आहे, त्यांचा अजून पी.एफ कट केला जात नाही अशा अनेक तक्रारी चे निरासरण करण्याकरिता ठेकेदार प्रकाश लाड यांच्या कंपनी क्रिस्टल इंटिग्रेटेर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेकेदार पद्धतीने काम देताना महापालिका कडून जो ठराव पास केला गेला त्याची प्रत मिळावी अशी विनंती सौ.सुषमा अजित शेलार युवती, युवासेना पिंपरी-चिंचवड यांनी माहिती अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.