शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ जानेवारी) :- पिंपळे गुरव, कासारवाडी, दापोडी व खडकी येथील भारतीय योग संस्थाच्या योग केंद्र महिला योग शक्तिदिवस एकत्रितपणे पिंपळे गुरव केंद्रामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी प्रकाश बंडेवार ज्येष्ठ साधक आणि संचालक भैरवनाथ ज्येष्ठ संघ यांनी दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उमा मोटेगावकर यांनी योगावर भजन गायले. सरस्वती वंदना : सुनंदा श्रीखंडे, आशा घावटे यांनी सादर केली. संदेश वाचन : इंदुमती पवार केंद्र प्रमुख पिंपळे गुरव केंद्र व आशीर्वचन गिरीश काटे केंद्र प्रमुख दापोडी यांनी महिलांच्या जीवनात योगाचे महत्व सांगितले. योग साधना आशा घावटे योग शिक्षक पिंपळे गुरव केंद्र यांनी घेतली.
या कार्यक्रमाच्या योगवार्ता 1.नारीशक्तिवरती सुनिता पवार, 2.महीला रोग वरती मनिषा लोंढे , 3.संजय शेवडे आणि 4. भारतीय योग संस्थान चे आमच्या जीवनातील योगदान व ओम् उच्चारण रविंद्र पालकर यांनी सादर केले.
प्रसाद वितरण सेवा इंदुमती पवार आणि केंद्रातील साधकांनी मिळुन दिली. सर्व केंद्रातील साधकांच्या सहभागामुळे कार्यक्रम खूप सुंदर झाला. प्रार्थना व शांतिपाठ म्हणून कार्यक्रम संपन्न झाला.