शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ जानेवारी) :- आमदार अण्णा बनसोडे यांनी शहरातील नागरिकांच्या विदयुत समस्यांबाबत बैठक घेतली , बैठकीच्या सुरवातीला आमदार अण्णा बनसोडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची व विद्युत समिती मधील पदाधिकारी यांची व त्या त्या भागातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची ओळख करून दिली . यावेळी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपआपल्या भागातील विविध समस्यांचा पाढाच आमदार बनसोडे यांच्या पुढे मांडला .
माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिपरी विभागातील उघड्या डी .पी. बॉक्स ची समस्या बोलून दाखवली तसेच पिंपरीमध्ये होणाऱ्या वीज चोरी बाबत लक्ष वेधले , यानंतर दापोडीच्या नगरसेविका माई काटे यांनी दापोडी परिसरात अंडर ग्राऊंड केबलींग करावे याबाबत निवेदन दिले , आकुर्डी व दत्तवाडी परिसरामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण तातडीने होत नसल्याचे इखलास सय्यद यांनी निदर्शनास आणले, विद्युत समिती सदस्य हिरालाल जाधव यांनी गांधीनगर भागातील अनियमित पणे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले , तसेच दर पंधरा ते वीस दिवसांनी मेन सप्लाय ची संपूर्ण वायर जळून जात असल्याने त्या नंतर पूर्ण २ दिवस गांधीनगर अंधारात जाते व हे सातत्याने घडत आहे.
नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे , तसेच दापोडी व बोपखेल साठी वेगवेगळा स्टाफ असावा जेणे करून त्या त्या भागातील समस्यांचे निराकरण तात्काळ होईल अशा सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या . तसेच पुढील आठवड्यात दापोडी, पिंपरी, गांधीनगर, आकुर्डी, दत्तवाडी, या भागाचा दौरा करून तेथील सर्व डीपी बॉक्स ,विद्युत तारा यांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे नियोजले आहे .
सदर बैठकीला महावितरण चे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप , भोसरी चे कार्यकारी अभियंता उदय भोसले , निगडी प्राधिकरणाचे सहायक कार्यकारी अभियंता श्री झोडगे , आकुर्डी चे कार्यकारी अभियंता श्री . कवडे, चिंचवड चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सौ . भोसले मॅडम , चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री . जाधव, पिंपरीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चाकूरकर , प्राधिकरण सब डिव्हिजन चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चौधरी , माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका माई काटे , सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे , आशा शिंदे , इखलास सय्यद , गंगाताई धेंडे , हिरालाल जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.