शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- चिखली जाधववाडी मोशी मध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. चिखली जाधववाडी तसेच मोशी या ग्रामीण भागात अनेक नवीन गृह प्रकल्प नव्याने विकसित झाले आहेत. यासर्व गृह प्रकल्पा मध्ये प्रजासत्ताक दिना निम्मित पिंपरी चिंचवड शहराचे मा. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आज सकाळी राहुल जाधव आणि मंगलाताई राहुल जाधव यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झाली या मध्ये प्रामुख्याने साई जीवन मनपा शाळा, अभिनव विद्यालय जाधववाडी, अंगणवाडी, विठ्ठल रुख्मिनी मंदिर, संत सावंत महाराज भाजी मंडई ,वडाचा मळा, सुभाष धायरकर मित्र मंडळ वाडा, , तसेच ऐश्वर्याम म्हाडा, इंद्रधनू सोसायटी, शंकेश्वर क्रिमसन, शंकेश्वर ड्रीम्स, मिलिनियम म्यानर, साई वस्तू पार्क, अक्षा वृंदावन, अक्षा एम्पायर अशा विविध ठिकाणी राहुल जाधव यांच्या हस्ते धवजारोहन पार पडले. जाधव यांनी विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिना निमित्त शुभेच्छा देताना सर्वांनी कोरोनाच्या या काळामध्ये योग्य ती काळजी घेण्याचे व शहर व आपला परिसर स्वछ ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी जाधव यांच्या समवेत मंगला जाधव तसेच अनेक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक विविध सोसायट्यांमधील सभासद आदी उपस्थित होते.