शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- प्रजासत्ताक दिनानिमित्त गवळीनगर मधील श्रमजीवी प्राथमिक माध्यमिक विद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यालय , ज्ञानसागर विद्यालय, श्री स्वामी समर्थ सोसायटी,न्यु इंग्लिश स्कूल येथे नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला.
स्वामी समर्थ सोसायटीतील बाल चमूने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले त्यानिमित्ताने मुलांना खाऊसाठी बक्षीस देण्यात आले.
आदर्श प्राथमिक विद्यालयात स्वच्छ पिंपरी चिंचवड शहर अभियानाअंतर्गत सर्व शिक्षक यांनी स्वच्छतेची शपथ घेतली ही शपथ देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी प्रवीण वाढे उपस्थित राहिले होते .
श्रमजीवी विद्यालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिक्षकांशी संवाद साधताना अपघातात शहीद झालेल्या जनरल बिपिन रावत व इतर भारतीय सैनिक अधिकारी तसेच सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच सर्व शिक्षकांंना बुस्टर डोस उपलब्ध झालेले असून ते घेण्यासाठी आवाहन शिक्षकांना करण्यात आले.तसेच सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.