शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- आकुर्डी येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त सिध्दार्थ नवराञ महोत्सव मिञ मंडळाच्या वतीने ध्वजावंदन व स्विकृत प्रभाग सदस्य सुनिल कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेविका शर्मिला राजेंद्र बाबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राची सुनिल कदम व प्रभागातील जेष्ठ नागरिक व महिला वर्ग व ङाॅक्टर संजिवकुमार पाटील व सौ मनिषा पाटील उपस्थित होते.
तसेच स्विकृत प्रभाग सदस्य सुनील कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आकुर्डी येथील रुग्णालयात रुग्णांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते निहाल पानसरे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.फळ वाटप कार्यक्रमास उद्योजक महेश काटे, सामाजिक कार्यकर्ता सरफराजभाई शेख , इरफान मुजावर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुनिल कदम मिञ परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.