शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०२ फेब्रुवारी) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे अल्पशा आजाराने आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले.
मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मावळली. मागील दीड महिन्यापासून बाबर आजारी होते. दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
त्यांच्या पश्चात बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, मधुकर बाबर, दोन मुले सूरज, धीरज, पत्नी, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Advertisement