शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०२ फेब्रुवारी) :- यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील जन्म-मृत्यू दाखले वितरण करण्याची वेळ वाढविण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपा नगरसेवक राजू बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील व वैद्यकीय अधिक्षक डाॅ.वाबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि,यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पिंपरी चिंचवड शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत असतात. त्यातच एखादा जन्म अथवा मृत्यू झाल्यानंतर दाखले मिळविण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते. दाखले वितरण करण्यासाठी वेळमर्यादा असल्याने काहीजणांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.दाखल्या अभावी नातेवाईकांची शासकीय कामे अडकून पडतात. तरी आपण दाखले वितरण करण्याचे काउंटर सकाळी १० ते ०५ या कार्यालयीन कामकाजात सुरू ठेवावे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होनार नाही.असे, दिलेल्या निवेदनात नगरसेवक राजू बनसोडे यांनी नमूद केले आहे.