तापकीर कुटुंबाने साधला प्रभाग 32मधील महिलांशी सुसंवाद
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ फेब्रुवारी) :- माजी नगरसेविका अनिता तापकीर आणि मच्छिंन्द्र तापकीर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभाला प्रभाग क्रमांक 32 मधील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मच्छिंन्द्र तापकीर यांच्या राहत्या घरी रविवारी पार पडलेल्या या समारंभाला तापकीर नगर, ज्योतिबा नगर, काळेवाडी गावठाण, राजवाडे नगर, आदर्श नगर, पवना नगर, रहाटणी परिसरातील हजारो महिलांनी हजेरी लावली होती. यावेळी माजी नगरसेविका अनिता तापकीर आणि माजी विरोधी पक्षनेते मच्छिंन्द्र तापकीर यांनी महिलांचे स्वागत करून त्यांच्याशी सुसंवाद साधला.
यावेळी परिसरातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले होते. कार्यक्रमादरम्यान महिलांनीही मच्छिंन्द्र तापकीर आणि अनिता तापकीर यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याची शास्वती दिली.
दरम्यान, उपस्थित महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू आणि अल्पोपहाराचेही आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन युवा नेते सागर मच्छिंन्द्र तापकीर आणि मच्छिंन्द्र तापकीर युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केले होते.