शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ फेब्रुवारी) :- पिंपळे गुरव ते पिंपळे सौदागर राखीव मिलिट्री ग्राउंड मध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. पिंपळे सौदागर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत होते.आगीचे लोट दिसताच निखिल पडळकर व प्रतीक जगताप यांनी तात्काळ जाऊन मदत केली व तेथील महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधला व सर्व परिसरातील लाईट बंद करण्यात साठी विनंती केली.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन मिलिट्री ग्राउंड मध्ये आगीचे लोट विजवण्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत प्रयत्न केले. व त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सर्व सैनिक बांधव, निखिल पडळकर, प्रतीक जगताप, रोहित घंटे, व सर्व अग्निशामक दलाचे मुख्य ऋषिकेश चिपाडे, सुरज गवळी, विकास नाईक, मंगेश देवगडकर, विजय घुगे, मयूर कुंभार, श्रीकांत वैरागर कर्मचारी उपस्थित होते.