तिकोना गडावरून आणली शिवज्योत… शिवकन्यांचे विविध स्तरातून कौतुक
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी) :- दिनांक 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थाना चे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती महोत्सवाच निम्मित साधून 8 मुलींच्या समूहाने ( मोरेवस्ती) येथील फक्त मुलींची टीम,अशा ह्या सर्व कराटे च्या मुलींनी तिकोना किल्ला येथे 12.15 च्या, सुमारास शिव ज्योत पेटवून शिवरायांना मानाचा मुजरा तसेच वंदन करून, अभिवादन करून साधारण रात्री 2 वाजता तेथून मार्गस्थ होऊन तिकोना ते चिखली मोरेवस्ती ( ओम साई सोसायटी) अनवाणी पायांनी पेटती मशाल धावत येऊन त्यांनी 44 किलोमीटर चा टप्पा अगदी सहजगत्या पार पाडला, अगदी जिद्द आणि चिकाटी मनाशी बाळगून राजमाता जिजाऊ यांच्या आचार विचारांची प्रेरणा घेऊन ह्या छोट्या रनरागिणी धावत होत्या, सकाळी आपला प्रवास पूर्ण करून थोडा वेळ तासभर विश्रांती घेऊन पुन्हा त्या कोरीगड, तुंग, आणि विसापूर किल्ला, या ठिकाणी ज्योत लावण्यासाठी पुढे सरसावल्या, तो प्रवास गाडी ने जाऊन पूर्ण केला आणि किल्ला सर केला, तिकोणा पासून सुरवात नंतर कोरीगड, तुंग किल्ला, शेवटी विसापूर किल्ला हा सर्व प्रवास 1 दिवसात च पूर्ण केला, आपला प्रवास न थकता कुठलीही तक्रार न करता यशस्वी पणे पार पाडला.
महाराष्ट्राला लाभलेलं हे गड किल्यांचं अप्रतिम सौंदर्य,अभिमान वाटावा छत्रपती शिवाजी राजांच्या ह्या भूमीत अशा लेकीं जन्माला येणं खूप भाग्याच समजतो, ह्या रणरागिणी च कौतुक करावे तेव्हढ थोडं च, आज पर्यंत ऐकलं होतं पाहिलं होतं फ़क्त पुरुषमंडळी आणि तरून वर्ग यांना च मशाल घेऊन येताना पाहत आलोय, तिकोना किल्ल्यावरील 1 सेवेकरी बाबा नि देखील त्यांचं कौतुक करत ते बोलले की मी इथे बरीच वर्षे झाली गडाची देखभाल आणि सेवा करत असल्यापासून, पहिल्यांदा असे मुलींनच्या समूहा एव्हड्या रात्री उत्साहाने गड चढत येऊन शिवज्योत लावन, खरं खूप अभिमानाची गोष्ट आहे, मी 1 मुलगी म्हणून हे करू शकते, मी कुठे ही मागे राहणार नाही, स्त्रीयांना कुठल्याही क्षेत्रात कमी लेखू नका, अशा आशयाचा जणू संदेश ह्या समाज मनात निर्माण करण्याचा त्यांचा एक छोटासा प्रयत्न आणि कुठलीही तक्रार न करता यशस्वी पणे पार पाडला उपक्रम , वृदुला पवार,भक्ती दहिफळे, सानिका माने, श्रावणी पाटील ,मधुरी पाटील ,नेत्रा ढगे , श्वेता निमन ,दीप्ती पाटील या आधी त्यांनी बरेच किल्ले, गड सर केलेत, ह्या उपक्रमास त्यांना नेहमी प्रोत्साहित करणारे, त्यांना नेहमी सपोर्ट करणारे त्यांचे प्रशिक्क प्रफुल सर,त्यांचा मोलाचा वाटा आहे.