शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ फेब्रुवारी) :- पिंपरी चिंचवड शहरातील विद्यमान नगर सेवक संदीप वाघेरे यांच्या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने शनिवार दिनांक २६/०२/२०२२ रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत हाऊस किपिंग, नर्स, सुरक्षा रक्षक, टाटा मोटर्स कंपनीसाठी आय.टी.आय. पेशंट केअर, बाऊंसर, इलक्ट्रीशिएन, गार्डनर, प्लंबर, या पदासाठी नोकर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचा इच्छुक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगर सेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.
या नोकर भरती मेळाव्याला यशस्वी करण्या करीता भोसले ग्रुप फॅसिलिटी लिमिटेड या कंपनीचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
सदर मेळावा नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांचे जनसंपर्क कार्यालय,तपोवन मंदिर रोड,पिंपरी गाव येथे होणार असून अधिक माहितीसाठी ७८८७८८७९४९ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजाकांच्या वतीने करण्यात आले आहे.