वृत्तसंस्था
शबनम न्यूज : पुणे (दि.२५ फेब्रुवारी) :- तब्बल 2700 घरांसाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार (दि.26) रोजी सायंकाळी 4 वाजता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे ऑनलाईन अर्ज भरण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
कोरोना संकटात गेल्या दीड – दोन वर्षात राज्यातील तब्बल 15 हजार 495 गरिब व सर्वसामान्य कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पुणे म्हाडामुळे साकार झाले आहे. दोन-तीन वर्षांतून एखादी सोडत काढणा-या पुणे म्हाडाने मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीड वर्षांत तब्बल चार बंपर सोडत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पुणे म्हाडाच्यावतीने दोन महिन्यांपूर्वी ४ हजार २२२ घरांसाठी सोडत काढली होती.
Advertisement