शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ फेब्रुवारी) :- पिंपरी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे व नगरसेविका निकिता कदम यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत ,मिलिंद नगर कमान तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका केंद्र या सर्व पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे तसेच माजी महापौर संजोग वाघेरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक नगरसेविका व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व विकास कामांसाठी नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका उषा ताई वाघेरे ,नगरसेविका निकिता कदम या तिन्ही नगरसेवकांनी वेळोवेळी बरेच दिवसापासून पाठपुरावा करून ही विकास कामे पूर्णत्वास नेली आहे. त्यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले. या तिन्ही नगरसेवकांनी नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले याचे समाधान व्यक्त केले.