शबनम न्यूज : पुणे (दि.२३ मार्च ) :- दिवंगत अभिनेत्री आणि भरतनाट्यम नृत्यांगना अश्विनी प्रमोद एकबोटे यांच्या स्मरणार्थ पुण्यातील भारतीय कला केंद्र संस्थेतर्फे आयोजितकार्यक्रमात ज्येष्ठ नृत्यांगना गुरूडॉ. सुचेता भिडेचापेकर यांच्या हस्ते अभिनेत्री व नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांना भरत नाट्य मंदिरात मंगळवारी (ता. २२) ‘अश्विनी पुरस्कार‘ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि ११ हजार रुपये होते.
पुण्याच्या नृत्यकला मंदिर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा पुरस्कार सुरु करण्यात आला असून पूर्वी ऑनलाईन जाहीर केलेला सन २०२१ चा हा ‘अश्विनी पुरस्कार’ भारतीय कला केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात देण्यात आला. या पुरस्काराच्या निवड समितीचे काम गुरु डॉ. स्वाती दैठणकर, गुरु नंदकिशोर कपोते, विवेक इनामदार, नीरजा आपटे यांनी पहिले.
अश्विनी एकबोटे चित्रपट,नाट्य आणि मालिकासृष्टीत सातत्याने काम करीत असल्या शिखरावर असल्या तरी नृत्याची कास त्यांनी कधीही सोडली नाही.नृत्यामध्ये सतत प्रयोगशील राहून अश्विनी एकबोटे यांनी दर्जेदार सादरीकरणाचा एक वस्तुपाठ घालून दिला, त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील असे सांगून जेष्ठ नृत्य कलावंत डॉ. सुचेता भिडे – चापेकर यांनी अश्विनी एकबोटे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या पुढे म्हणाल्या कि, कलावंत म्हणून अश्विनी एकबोटे उत्तम होत्या आपल्या शिष्यांना शेवटपर्यंत त्या शिकवत राहिल्या शर्वरी जेमिनीस देखील हीच परंपरा पुढे सुरु ठेवतील, असा विश्वास मला वाटतो. असे त्या शेवटी म्हणाल्या.
शास्त्रीय नृत्य आणि अभिनय या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारास प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती नृत्यकला संस्थेच्या संचालिका, संस्थापिका तेजश्री अडीगे यांनी दिली. या कार्यक्रमास भारतीय कला केंद्राचे प्रमोद एकबोटे उपस्थित होते.नृत्यमंजिरी संस्थेस पुरस्कार आणि ‘त्या साऱ्या’ समूहाचे वतीने यावेळी अश्विनी एकबोटे यांच्या शिष्या सुचेता जोशी संकल्पित व दिग्दर्शित ‘कलरलेस‘ कार्यक्रम सुचेता जोशी यांनी सहकारयांसह सादर केला. कार्यक्रमास कलाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.