पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये
शबनम न्यूज : मुंबई ( दि.२५ मार्च ) :- आयपीएलच्या 15 व्या सीजनची सुरुवात (IPL 2022) शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये रात्री होणार आहे. दोन्ही संघांनी मागच्या सीजनमध्ये शानदार खेळ दाखवला होता. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ एका वेगळ्याच अंदाजात फायनलमध्ये पोहोचला होता. चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये कोलकाताला नमवून चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवले होते. आता नव्या सीजनमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येत असून कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये बाजी कोण मारणार? हा प्रश्न आहे. कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही संघांकडे नवीन कर्णधार आहेत. केकेआरचं नेतृत्व श्रेयस अय्यर आणि सीएसकेच नेतृत्व रवींद्र जाडेजा करतोय.
दोन्ही संघांकडे मॅच विनर खेळाडू
केकेआरने श्रेयस अय्यरकडे कमान दिली आहे. धोनीने CSK ची कॅप्टनशिप रवींद्र जाडेजाकडे सोपवली आहे. दोन्ही संघांकडे नवीन मॅच विनर खेळाडू आहेत. कुठला संघ सामना जिंकणार? हे सांगण कठिण आहे. क्रिकेटमध्ये आकडे तसे महत्त्वाचे असतात. त्यावरुन कुठल्या संघांची बाजू वरचढ आहे, ते कळते.
चेन्नई सुपर किंग्स नाइट रायडर्सवर भारी
आकड्यांवर नजर टाकली, तर चेन्नइ सुपर किंग्सची बाजू सरस आहे. दोन्ही टीम्समध्ये एकूण 26 सामने झाले आहेत. यात 17 सामने चेन्नईने तर फक्त आठ सामने केकेआरने जिंकले आहेत. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सला दोन्ही लीग सामन्यांमध्ये पराभूत केले होते. चेन्नईने पहिला सामना सहा गडी राखून जिंकला तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्सने दोन विकेटने गमावला. फायनलमध्येही चेन्नई सुपर किंग्सने कोलकाताला 27 धावांनी पराभूत केलं होतं.