शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ एप्रिल) :- दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव पुणे येथे आज दिनांक 11 एप्रिल रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीने 2022 -2023 चे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात आले.
सर्व प्रथम शाळेचे स्थानिक समितीचे उपाध्यक्ष आयु. शशिकांत दुधारे सर यांच्या हाताने बांधलेल्या रिबन ची गाठ सोडून शाळा सुरू झाल्याचे घोषित करण्यात आले, त्यानंतर सारनाथ परिसरात बुद्ध रुपासमोर दहावी(First Batch) च्या मुलांनी वंदना आणि धम्मपाठ सादर केला. नंतर सभागृहात चक्रवर्ती सम्राट अशोक, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात बोलतांना आयु.दुधारे सरांनी सांगितले की करोना काळानंतर शाळा पुन्हा सुरू होत आहे , यात शाळेला किंवा वयक्तिक पालकांना काहीही अडचण येऊ देणार नाही असा विश्वास दिला. कार्यक्रमात सुंदर असे पूजा स्थान करण्यात आले होते.. लक्ष वेधून घेणारी रांगोळी,स्कूल च्या आवारात वेगवेगळ्या पद्धतीने केलेली कलाकृती, फुग्यांची मनमोहक सजावट..यातून सर्व टीचर्स ची मेहनत दिसून आली.नंतर पालक सभा घेण्यात आली.पालकांशी सहज हितगुज,संवाद साधताना स्कूल चे अध्यक्ष अरविंद साळवे सरांनी शाळेचा 10 वर्षांचा आलेख सांगितला,तसेच पालकांचे प्रश्नही समजून घेतले…स्कूल च्या सचिव *मनीषा मॅडम यांनी या पुढील वर्षीच्या बदललेल्या गोष्टींची माहिती दिली.
कार्यक्रमात आयु. खिल्लारे सरांनी भगवान बुद्धांची सुंदर मनमोहक मूर्ती शाळेला दान दिली त्याबद्दल त्यांचे आणि अक्षय शिंदे यांच्या कडूनही स्कूल ला सतत होत असलेल्या मदतीसाठी दोघांचेही आभार मानण्यात आले. स्कूल चे कार्यालयीन अधीक्षक आयु. अजित गायकवाड सर यांनी यावर्षीची केलेली कामाची माहिती, सध्याचे आर्थिक बजेट या बद्दलची माहिती देवून पालकांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.. कार्यक्रमाला बहुसंख्य पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते ,प्रामुख्याने शाळेचे कायदेशीर सल्लागार आयु. ऍड. प्रविणकुमार गायकवाड सर , आयु. कांबळे दादा उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन आयु.करुणा शिरसाट मॅडम यांनी केले तर आयु.आम्रपाली मिस यांनी सगळ्यांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता खीर वाटप करून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. आदित्य साळवे सर , आयु. प्रतीक्षा साळवे मॅडम , आयु. आशा कांबळे मॅडम आयु.आम्रपाली कांबळे मॅडम आयु. सागरिका कांबळे मॅडम , आयु.गायत्री मिस , मावशी आयु. जयश्री दरेकर आणि दहावी ची मुले आणि विशेष करून पालक आयु. अक्षय शिंदे सर , आयु. अमोल सर, आयु. बिपीन खैरे यांनी विशेष परिश्रम घेतले .