भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
शबनम न्यूज : पुणे (दि.१२ एप्रिल) :- भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय नृत्यावर आधारित ‘नवनायिका’ ही नृत्यनाटिका सादर केली जाणार आहे.कलाश्री नृत्यालय,पुणे निर्मित ही नृत्यनाटिका शनिवार,१६ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे सादर केली जाणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
या नृत्यनाटिकेची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन गुरु श्रीमती प्रमद्वारा कित्तूर यांची आहे. संगीत अजित अवधानी यांचे असून कलाश्री नृत्यालयाच्या २० कलाकार या नृत्यनाटिकेत सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११८ वा कार्यक्रम आहे.