शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ एप्रिल) :- पवित्र रमजान महिन्यात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना एक तास अगोदर सुट्टी द्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांनी प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रमजान महिन्यात उर्दू शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे उपवास असल्याने पुणे महानगरपालिका शिक्षण विभागात अशी विद्यार्थी व शिक्षकांना पवित्र रमजान महिन्यात एक तास आधी शाळेची सुट्टी देऊन सवलत दिली जाते. त्याचप्रमाणे आपल्या स्तरावरून हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व उर्दू शाळांना पवित्र रमजान महिन्यात एक तास अगोदर शाळा सोडण्यासाठी सवलत द्यावी, असेही सदर निवेदनात शहाबुद्दीन शेख यांनी नमूद केले आहे.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख उपाध्यक्ष अर्षद वाढ पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष वसीम शेख भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख उपस्थित होते.