शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बापू दिनकर कातळे यांच्या श्री बापू आण्णा कातळे स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने भव्य पासिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान संपन्न झाले.
या स्पर्धेत एकूण ४० संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेत पुरुष व महिला संघाचा मोठ्या प्रमाणात समावेश घेण्यात आला होता. तसेच या स्पर्धेमध्ये सोसायटी हाफ सुद्धा घेण्यात आला होता. या स्पर्धेत पुरुष संघास प्रथम क्रमांक ३१००० व चषक तसेच द्वितीय क्रमांक २१००० व चषक व तृतीय क्रमांकाला अकरा हजार व चषक असे बक्षिसाचे स्वरूप ठेवण्यात आले होते, तर महिला संघास प्रथम क्रमांक १५००० व चषक द्वितीय क्रमांक ११ हजार व चषक आणि तृतीय क्रमांक सात हजार व चषक असे बक्षिसाचे स्वरूप देण्यात आले. सदर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये सोसायटी हाफ मध्ये फक्त प्रभाग क्रमांक २४ मधील संघांनाच प्रवेश देण्यात आला होता.या स्पर्धांचे आयोजन स्वागत थोरात यांनी केले.
क्रीडाक्षेत्रात आपल्या प्रभागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने आपण या स्पर्धांचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया बापू दिनकर कातळे यांनी व्यक्त केली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच संपन्न झाले.
या स्पर्धा काळात महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव प्रसाद लिमन, नवनाथ तरस, संजय कातळे, अंकुश तरस, दिलीप तरस, बाळासाहेब तरस, सनी हापसे ,सचिन राऊत, लखन तरस, संदीप तरस, प्रसाद तरस, अभिषेक दांगट या मान्यवरांनी भेटी दिल्या.
या वेळी महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ गव्हाणे, चिंचवड सभा विधानसभा नेते नानासाहेब काटे, कार्याध्यक्ष पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख व माजी शहराध्यक्ष युवक विशाल भाऊ वाकडकर पिंपरी चिंचवड युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप उपस्थित होते . उपस्थितांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करीत भविष्यकाळातील क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या, सर्व उपस्थितांचे बापू कातळे यांनी आभार व्यक्त केले.