शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२१ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती स्वस्थ च्या तक्रारी असल्याने त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्याना या उपचार दरम्यान अमेंरिकेतून इंजेक्शन आणण्याची आवश्यकता होती हे इंजेक्शन अमिरिकेहुन आणण्या साठी जी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते या करिता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीला महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री अजित पवार धावून आले असल्याची बातमी समोर येत आहे.
मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरातील काही विकास कामांचे उदघाटन रद्द करून अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृती ची थेट रुग्णालयात जाऊन माहिती घेतली होती. आमदार लक्ष्मण जगताप हे अजित पवार यांचे एके काळचे कट्टर समर्थक होते परंतु आमदार लक्ष्मण जगताप यांनी २०१४ मध्ये भाजपची वाट धरली तसेच पिंपरी चिंचवड शहरातील ,महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सत्तेला धक्का देत २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची एकहाती सत्ता स्थापन केली.