शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२१ एप्रिल) :- प्रभाग क्र १३ मधील भोसरी विधान सभेचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांच्या तर्फे मोरे वस्ती ,ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती आदी भागातील क्रिकेटपटू यांच्या साठी टी शर्ट चे अनावरण करून वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन नेताजी काशीद युवा मंच च्या वतीने केले होते.
यावेळी भोसरी विधान सभेचे शिवसेनेचे शहर संघटक रावसाहेब थोरात, पुणे जिल्हा समनव्यक राहुल भोसले आणि शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भारतात सर्वत्र क्रिकेटची आवड आहे. अनेक उत्तम दर्जाचे खेळाडू पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळतात मात्र आर्थिक परिस्थिती भक्कमपणे नसल्याने त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना आपल्या खेळापासून वंचित राहावे लागते. मात्र आता नेताजी काशीद युवा मंच च्या वतीने अशा खेळाडूंना योग्य ती मदत करण्याची इच्छा आहे त्यासाठी उत्तम प्रशिक्षकांच्या बरोबर लवकरच चर्चा केली जाणार आहे असे भोसरी विधानसभेचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी सांगितले.यावेळी अनेक संघाच्या खेळाडूंना टी शर्ट चे वाटप करण्यात आले. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि खेळाडूंचे नेताजी काशीद युवा मंच च्या वतीने आभार मानण्यात आले.