शबनम न्युज | चिखली
जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एकाच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सोमवारी (दि. १६) रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास पवारवस्ती चिखली येथे घडली.
राहुल रमेश रेड्डी ( वय १८, रा. कासारवाडी ) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेश क्षीरसागर, दानेश, आदित्य पुजारी, गणेश चंद्रकांत सिंगुलवार ( वय 21,रा.कुदळवाडी चिखली ), सिराज अन्सारी, बाजीराव मिसाळ , अक्षय शेडगे ( रा. कुदळवाडी , चिखली ) या आरोपींविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘का रे तुला मस्ती आली का. तू भाई झाला का ‘असे म्हणून आरोपीनी गणेशला रॉडने मारले. त्यानंतर आरोपींनी’आम्ही कुदळवाडीचे भाई आहोत आमच्या नादाला लागला तर तुझी गेम करतो ‘असे म्हणत गणेशला शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी राहुल हे भांडण सोडविण्यासाठी गेले असताना आरोपी सिराज याने त्याच्या पॅन्टच्या खिश्यातील चाकू काढून फिर्यादी राहूल यांच्या पोटात भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.