नगरसेवक नाना काटे व शितलताई काटे यांच्या पाठपुराव्यास यश
शबनम न्युज | पिंपरी
रहाटणी पिंपळे सौदागर मधील कमी व अपुऱ्या पाणी पुरवठा सदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. वेळोवेळी परिसरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी या समस्येबाबत पत्र व्यवहार व बैठका घेवून पाठपुरावा केला पूर्त्यावी या परिसरात ड प्रभाग येथील टाकीवरून पाणी पुरवठा केला जात होता परंतु तो कमी होता ही समस्या पाहता नाना काटे व शितालताई काटे यांनी तत्कालीन आयुक्त यांना कुणाल आयकॉन रोड येथे नवीन पाण्याची टाकी बनवावी, यासाठी पाठपुरावा केला व नवीन २० लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर करून घेतली व ती पूर्ण केली या केलेल्या पाठपुराव्या नुसार आज दि. २७ मे २०२२ रोजी, कुणाल आयकॉन रोड वरील रोझलेंड सोसायटी जवळील २० लाख लिटर नाविन पाण्याची टाकी मधून कुणाल आयकॉन रोड वरील सर्व सोसायटी ना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन Water Distibution Pipe Line टाकण्याचे काम चालू करण्यात आले आहे .
हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना नाना काटे यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या तसेच या पाणीच्या टाकीवरून कुणाल आयकॉन रोड वरील सर्व सोसायटी ना पाणी पुरवठा केला जाईल त्यामुळे कुणाल आयकॉन रोड वरील सर्व सोसायटी ची पाणी समस्या लवकरच सुटेल असे नाना काटे व शीतलताई काटे यांच्या वतीने सांगण्यात आले.