शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
कामगारांची पिळवणूक करणारे मे. डिव्हाईन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस यांचेवर कारवाई करा, अशी मागणी धम्मराज साळवे (शहराध्यक्ष -पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा) यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची माहिती देण्यासाठी महापालिकेने ठेकेदारांकडे काम सोपविले आहे. मात्र, ठेकेदाराने दोन महिने झाले कंत्राटी कामगारांचा पगारच दिला नाही. पगार मागितला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे स्मार्ट सिटीचा डौल मिरविणारी महापालिका आणि संबंधित ठेकेदारांकडे काम करणारे कामगार पगाराविना असल्याचे वास्तवसमोर आले आहे. डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट अॅण्ड सर्व्हिसेस नावाच्या कंपनीला कचऱ्यांचे विलगीकरण करण्याची माहिती देण्याचे काम दिले आहे. ही कंपनी इंदौरची आहे. यांचे कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा विलगीकरणाविषयी माहिती देतात. त्यासाठी त्यांचा पगारही ठरलेला आहे. मात्र, दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही. पगाराविषयी विचारले असता कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत असल्याचे संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार कळते सादर मे. डिव्हाईन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस यांचे व्यवस्थापक कामगारांचे पिळवणूक करत असल्याचे दिसून येते कामगारांना योग्य वेतन दिले जात नाही अनेक कामगारांचे वेतन रोख स्वरूपात दिले जाते अथवा बँक मध्ये जमा करून पुन्हा त्यात कट करून पगार दिला जातो व महानगरपालिकेवर खापर फोडण्याचे काम सदर कंपनी करते आरोग्य विभागास तक्रार केल्यानंतर आमचा यात काही संबंध नाही असे स्पष्ट बोलून कामगारावर अन्याय होत आहे तरी आपण तात्काळ चौकशी करून सदर मे. डिव्हाईन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस यांचे कंत्राट रद्द करून त्यांना ब्लॅक लिस्ट करावे, असे हि सदर निवेदनात धम्मराज साळवे यांनी नमूद केले आहे.