शबनम न्युज | पिंपरी
माजी नगरसेवक संदीप वाघेरे व जेष्ठ नागरिक संस्था आयोजित मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा सांगता समारंभ जेष्ठ नागरिक संस्था सभागृह येथे ( दि.१४ जून ) पार पडला.
पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वगैरे व जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हेल्थ व्हॅल्यू संस्थेच्या सहकार्यातून ज्येष्ठ नागरिक संस्था सभागृहांमध्ये दिनांक आठ जून ते दिनांक 14 जून पर्यंत मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरास ज्येष्ठ नागरिक व महिलांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला जवळपास ६०० हून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरी येथील ज्येष्ठ नागरिक संस्था व जेष्ठ नागरिक संघ यांना ॲक्युप्रेशर थेरपी मशीन भेट स्वरूपात देण्यात आली.
सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक संदीप वगैरे, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष धुंड्या स्वामी सर, कार्याध्यक्ष सुधाकर यादव सर, सचिव अशोक कुदळे, गुलाबराव सोनवणे वसंत तावरे, सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.