शबनम न्युज | पिंपरी
प्रायमरी शिक्षणाचा महोत्सव सुरवात काल रुपीनगर तळवडे येथे एक आगळावेगळा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम पार पडला. गेली १ महिन्यापासून सुरुवात झालेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन व लकी ड्रॉ काल मोठ्या दिमाखात पार पडला. सौ. शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या माध्यमातून रुपीनगर, तळवडे, सहयोग नगर, परिसरातील २४० मुलांना प्री-प्रायमरी शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. ६०० पेक्षा जास्त पालकांनी यासाठी अर्ज सादर केले होते व त्यातील लकी ड्रॉ मध्ये २४० मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. केंब्रिज इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या उद्घाटन प्रसंगी भोसरीचे आमदार माननीय महेशदादा लांडगे, कामगार नेते इरफान सय्यद, केंब्रिज शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व परिवाराची प्रगती व्हावी हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असतं परंतु सर्वसामान्य पालकांना शिक्षण घेणे शक्य नसते याचा विचार करून प्राथमिक या वर्षी २४० मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण व त्याचबरोबर सर्वांगीण विकास केला जाईल असे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. धनंजय वर्णेकर यांनी केले. सौ व श्री वर्णेकर हे या भागामध्ये नेहमीच सामान्य लोकांच्या समस्या वर कार्य करत असतात. नेहमीच सगळे वेगवेगळे उपक्रम राबवतात ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच लहान मुले या सर्वांसाठी नेहमीच उपक्रम राबवत असतात. शिक्षणा शिवाय प्रगती नाही. आज सर्वसामान्य पालकांना उत्तम शिक्षण घेणे अवघड आहे पण सौ. शितलताई वर्णेकर यांनी माझ्या भागातील मुलांची जबाबदारी माझी आहे व हे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचे कार्य फार मोठे आहे.हे माझे सहकारी आहेत याचा मला अभिमान आहे असे वक्तव्य अध्यक्षीय भाषणात मा.श्री महेशदादा लांडगे यांनी केले. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नेहमीच आपलेपणाने व आपली जबाबदारी समजून वर्णेकर परिवार कार्य करत आहे.
सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा मंत्र दिला आणि तो खऱ्या अर्थाने हे पुढे नेण्याचे कार्य करत आहे असे उद्गार कामगार नेते प श्री. इरफान भाई सय्यद यांनी केले. तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ खंबीरपणे उभा आहे तो कुठेही कमी पडणार नाही असे उद्गार ह भ प सौ संगीता नालेकर यांनी केले. समाजातील प्रत्येक घटकाला भरभरून देण्याचे कार्य शितलताई करत आहे मा.श्री .अरुण दादा थोपटे यांनी सांगितले आपल्या भाषणात सांगितले तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण क्षेत्रात योगदान असताना आपल्या परिवारातील सर्व सामान्य पालकांच्या मुलांना हे शिक्षण मिळावे त्यांची प्रगती व्हावी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता माझ्या विभागातील प्रत्येक व्यक्ती माझी आहे असा विचार करणारे डॉ. धनंजय वर्णेकर सर यांना नेहमीच वाटत असते. सर्वसमावेशक विचार सर्व सर्व सर्वांना एकत्र घेऊन कार्य करतात असे रिलीप संस्थेचे मा.श्री समीर मुल्ला यांनी प्रतिपादन केले.
अत्यंत सुंदर अशा वातावरणात उतकऺठा वाढवणारा लकी ड्रॉ, रंगीबेरंगी वेशतील लहान मुले ,पालक आणि उत्तमरीतीने शेवटपर्यंत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी विभागातील सर्व मान्यवर, माजी नगरसेवक श्री सुरेश तात्या म्हेञे, स्वीकृत नगरसेवक पांडभाऊ भालेकर, मार्गदर्शक श्री गोपाळ तात्या भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर,किरण पाटील, महाराष्ट्र विद्यालयाचे अध्यक्ष श्री गौड सर, ज्ञानदीप शाळेचे अध्यक्ष एस. डी. भालेकर, संचालक रमेश भालेकर, संपत भालेकर, माजी शिक्षण सभापती श्री धनंजय भालेकर, युवा नेते अमोल भालेकर, शरद भालेकर, दादा सातपुते, रहीम शेख,जावेद पठाण, अकबर शेख, रामभाऊ भालेकर,रवी शेतसंधि , रवी एकशिंगे, मोहन शेवाळे, अकलाक शेख, नबी सय्यद,इमरान शेख, चेतन तळपे, बप्पा जाधव,दादा तळेकर, पढरीशेठ गरूड,मिलीद काजळे , कल्पेश गरुड स्वपनील वाघमारे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पतंगे गुरुजी, अध्यक्ष कॅप्टन कदम घार जाई जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री वाळूजकर ,आदरणीय श्री कोडीबादादा भालेकर व त्यांचे सर्व सहकारी, युवानेते शिरीष उतेकर, दादा नरळे, संतोष पवार, नितीनजी बोडे, के. डी.वाघमारे ,विशालजी मानकरी, सौ. सुजाताताई काटे, सौ. अस्मिताताई भालेकर, सौ. शितल पवार, सौ.संगीताताई देशमुख,सौ.स्वाती कासार, सुलभाताई बोडके, शितल पारखी, नीता शिदे, तसेच मोठ्या प्रमाणात पालक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शुभांगी शिंदे व संदीप साकोरे यांनी केले.